SetuKit
Setu CRM for VLEs

प्रत्येक साईज प्रत्यक्ष अर्ज भरून तपासलेली — 6 portals

सरकारी फॉर्मसाठी फोटो, सही आणि कागदपत्रे नेमक्या साईजमध्ये

Aaple Sarkar, Police, MPSC, Gazette — form निवडा, file टाका, download करा. Exact pixels, exact KB, आणि file तुमच्याच device वर राहते.

प्रत्येक पोर्टलची अट वेगळी

आपले सरकार, MPSC, MHT-CET, पोलीस व्हेरिफिकेशन, जात वैधता आणि राजपत्र — प्रत्येक पोर्टलची फोटो, सही आणि कागदपत्रांची अट वेगळी आहे. एका फॉर्मसाठी बनवलेली फाइल दुसऱ्यावर नाकारली जाते, आणि error संदेश नेमके कारण सांगत नाही.

इथली प्रत्येक अट प्रत्यक्ष अर्ज भरून तपासलेली आहे. वरचं बटण दाबा — त्या पोर्टलचा नेमका आकार आणि KB मर्यादा आधीच भरलेली मिळेल.

तीन गोष्टी ज्या इतर टूल सांगत नाहीत

मर्यादा दोन्ही बाजूंनी असते. फक्त कमाल आकडा बघू नका. आपले सरकारवर फोटो ५ KB पेक्षा मोठा आणि कागदपत्र ७५ KB पेक्षा मोठे असावे लागते. WhatsApp वरून आलेला फोटो ४० ते ६० KB चा असतो आणि तो लहान असल्यामुळे नाकारला जातो. साधे compress करणारे टूल इथे उलट काम करते.

काठावरचा आकडा टाळा. आपले सरकार उंची २०० ते २१२ पिक्सेल सांगते, पण नेमकी २१२ ठेवली तर काही वेळा नाकारली जाते — encoding एका पिक्सेलने गोल करते आणि काठावर ती मर्यादेबाहेर जाते. २०५ सुरक्षित.

फाइलचे नाव तपासा. पोलीस व्हेरिफिकेशन आणि MPSC नावात मोकळी जागा, ठिपके किंवा विशेष चिन्हे स्वीकारत नाहीत — पण error मात्र आकाराबद्दल बोलतो. म्हणून लोक बरोबर असलेली फाइल पुन्हा पुन्हा compress करत बसतात.

तुमची फाइल तुमच्याच device वर राहते

इथली सर्व प्रक्रिया तुमच्या browser मध्ये होते. आधार, PAN, बँक पासबुक, सही — कोणतीही फाइल कोणत्याही सर्व्हरवर पाठवली जात नाही. हा फक्त दावा नाही, ही रचनाच आहे: browser मध्ये Developer Tools उघडून Network विभाग बघा, फाइल टाका — एकही upload request दिसणार नाही.

सविस्तर तुलना सर्व पोर्टलच्या साईज यादीत आहे.

All tools and guides

Photo & signature

Police verification photo & signature MPSC photo & signature resizer MHT-CET photo & signature resizer Signature cleanup Name & date on photo Resize a signature for forms Compress an image to 20 KB Compress an image to 50 KB Compress an image to 100 KB

Documents & PDF

Compress a document to 75–500 KB Police verification document upload Compress a PDF to 500 KB Merge PDF Split PDF JPG to PDF PDF to JPG

Printing

Passport photo sheet ID card at PVC size

मार्गदर्शन — पोर्टलच्या अटी

सर्व पोर्टल — फोटो व सही साईज आपले सरकार फोटो साईज MPSC फोटो आणि सही साईज MHT-CET फोटो आणि सही साईज जात वैधता — फोटो, सही, कागदपत्रे राजपत्र फोटो आणि कागदपत्र साईज PVC कार्ड छपाईचा आकार

मार्गदर्शन — दाखले आणि प्रक्रिया

उत्पन्नाचा दाखला — कागदपत्रे अधिवास प्रमाणपत्र — कागदपत्रे राजपत्रात नाव बदल — प्रक्रिया

मार्गदर्शन — फाइल साईज

फोटो 20 KB कसा करायचा फोटो 50 KB मध्ये सही 10 KB मध्ये PDF 500 KB मध्ये आधार दोन्ही बाजू एका PDF मध्ये फाइलचं नाव आणि नाकारलेला अर्ज फोटो अपलोड होत नाही?